मुंबई : मुंबई विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था, संलग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालये व स्वायत्त महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची (पोस्ट ग्रॅज्युएशन – मास्टर्स) प्रवेश प्रक्रिया आजपासून (२२ मे) सुरु झालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी आणि अर्ज सादर करता येणार आहे. तर २६ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.

विद्यार्थ्यांना http://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने होईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर चित्रफितीची लिंक देण्यात आली आहे.

preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ

हेही वाचा – “रिक्षा किंवा टॅक्सीचालकांना निबंध लिहायला का लावत नाही?” म्हणणाऱ्या राहुल गांधींना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

विद्यार्थ्यांना २२ मे ते १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी आणि अर्ज सादर करणे अनिवार्य असेल. त्यानंतर २० जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित विभागामार्फत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होईल. २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना २५ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत तक्रार नोंदविता येईल आणि २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून ते १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश शुल्क भरायचे आहे. तसेच पहिल्या गुणवत्ता यादीनंतर १ जुलैपासून तासिकांना सुरुवात होईल. त्यानंतर २ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. दुसऱ्या गुणवत्ता यादीअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश शुल्क भरायचे आहे.

हेही वाचा – राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत जायचं आहे, मी चायनीजची ऑर्डर..”

पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया २५ मेपासून

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया शनिवार, २५ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च, इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री ॲण्ड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.