मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले असून बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यापीठातील ५३ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १७ अभ्यासक्रम, मानव्य विद्याशाखेतील २९ अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील २, आणि आंतरशाखीय विद्याशाखेतील ५ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यासाठी बुधवार, २२ जूनपासून uom-admissions.mu.ac.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
• ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज सादर करणे – २२ जून ते ४ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
• विभागामार्फत ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी – ०५ ते ११ जुलै (स.११.०० वाजेपर्यंत)
• तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी जाहीर करणे – १२ जुलै (सायं. ६.०० वाजेपर्यंत.)
• विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास – १३ जुलै (सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत)
• अंतिम गुणवत्ता यादी – १५ जुलै (सायं. ६.०० वा.)
• ऑनलाईन शुल्क भरणे– १६ ते १९ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)