लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढील काही दिवस सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश विनाविलंब होऊन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाो सलग चार दिवस येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय यापुढील प्रत्येक शनिवारी व रविवारी तसेच राजपत्रित सुट्टीच्या दिवशी कायम असणार आहे. त्यामुळे वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Places Of Worship Act 1991 Supreme Court.
Places Of Worship Act : मंदिर-मिशिदींविरोधात ‘तोपर्यंत’ दाखल होणार नाहीत नवे खटले, सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
three day special session in maharashtra legislative assembly start from today
विशेष अधिवेशन आजपासून: नव्या सदस्यांना शपथ, सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड
tuberculosis in Mumbai, eradicate tuberculosis,
क्षयरोग निर्मूलनसाठी मुंबईमध्ये राबविणार ‘१०० दिवस मोहीम’, २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबरपासून मोहीम सुरू होणार
Students paid tribute to Dr Babasaheb Ambedkar by studying for 68 hours Mumbai print news
६८ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने येत्या शनिवार व रविवारबरोबरच त्यांना लागून आलेल्या ईद व अनंत चतुर्दशीच्या सुट्टीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रवेश केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असेपर्यंत हा निर्णय यापुढील प्रत्येक शनिवारी व रविवारच्या सुट्टीबरोबरच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कायम असणार आहे.

आणखी वाचा-एसईबीसी व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ

वैद्यकीय व आयुष्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मर्यादीत कालावधी असल्याने आणि नियोजित वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले. सुट्टीच्या दिवशी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना धनादेशाद्वारे शुल्क भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रवेश घेतल्यानंतर पुढील कार्यालयीन कामकाजांच्या दिवसांमध्ये शुल्काची रक्कम डीडीद्वारे भरणे बंधनकारक असणार आहे.

Story img Loader