मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) आणि पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या (एलएलएम) प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये आणि ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करण्यात आले आहे. या दोन्ही परीक्षा मुंबई विद्यापीठातर्फे ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने रविवार, १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतल्या जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पेट’साठी एकूण ४ हजार ९६० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. तर ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी एकूण ४ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ‘पेट’ सकाळच्या सत्रात १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासांच्या कालावधीत होईल, तर ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा दुपारी ३ ते ४ या एक तासाच्या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थींनी परीक्षेच्या १ तास आधी संबधित परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

हेही वाचा – पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा

हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”

‘पेट २०२४‘साठी सर्वाधिक विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी अर्ज

‘पेट‘साठी प्राप्त झालेल्या एकूण ४ हजार ९६० अर्जांपैकी सर्वाधिक विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी २ हजार २८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापाठोपाठ मानव्य विद्याशाखेसाठी १ हजार ९९, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ८१३ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७६३ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच या एकूण अर्जांमध्ये २ हजार ८०४ विद्यार्थिनींचा, तर २ हजार १५५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एका तृतीयपंथी विद्यार्थ्यानेही अर्ज केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admit card for pet and llm pre entrance exams available for students mumbai print news ssb