दिवाळीच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) मार्फत करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थांच्या विशेष तपासणी मोहिमेला वेग आला आहे. प्रशासनाकडून मुंबईत नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात येत असलेली आणि विनापरवाना उत्पादन-विक्री करण्यात येत असलेली मिठाई जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला साठा २३ लाख ७१ हजार २६९ रुपये इतक्या किंमतीचा आहे. काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त तूप आणि खाद्यतेलाचा साठा जप्त केला होता.

हेही वाचा- तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्यातच ; गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारच्या हालचाली

CIDCO assurance Dronagiri Node project victims plots uran navi mumbai
सिडकोकडून द्रोणागिरी नोड प्रकल्पग्रस्तांना पुन्हा भूखंडाचे आश्वासन, ३५ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड वाटपाची प्रतीक्षा कायम
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
100 bed hospital in Uran is stalled again causing another delay after fifteen years
उरणचे उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, मंजुरी आणि भूमिपूजनानंतरही इमारतीचे काम रखडलेलेच
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Police Officer mixes ash in food for devotees Viral Video
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…
Sand Policy, Sand , Sand Auction, Scarcity ,
नागपूर : फसलेल्या वाळू धोरणाचे चटके, परराज्यातील वाळूचा पर्याय
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी

एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी चेंबूर छेडानगर येथील मेसर्स स्वीट मॅन्युफॅक्चरिंग या आस्थापनेवर छापा टाकला. त्यावेळी अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना मिठाई तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी रु.२३ लाख ७१ हजार २६९ किलोचा साठा जप्त केला. यात मावा चॉकलेट बर्फी ७० किलो (रु.२८००० किंमत), मावा पेढा २८ किलो (रु.११,२०० किंमत), मावा फॅन्सी ९०८ किलो (रु.३,३६,२०० किंमत), काजू फॅन्सी १४७८ किलो (रु.१०,३६,६०० किंमत), काजू कत्तली ८९८ किलो (रु.६,२८,६०० किंमत), काजू कत्तली पाईनऍपल १८ किलो (रु.१२,६०० किंमत), मावा कुंदा २९८ किलो (रु.१,१९,२०० किंमत) यासह अन्य प्रकारच्या मिठाईचा समावेश आहे.

हेही वाचा-‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांना ३० हजार कोटींचे बळ ; प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी

जप्त करण्यात आलेल्या मिठाईचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात येत आहे. ग्राहकांनी दिवाळीच्या निमित्ताने अन्न पदार्थांची खरेदी करताना विशेष काळजी करण्याची गरज आहे. तसे अवाहन एफडीएने केलेल आहे.

Story img Loader