अनंत चतुर्दशीनंतर मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी जाहिरातींचे फलक उतरविले नाहीत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा विद्रुप झाली आहे. परिणामी संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर नोटीस बजावण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवशी मंडप आणि आसपास झळकवलेले फलक काढणे बंधनकारक होते. परंतु गणेश विसर्जनानंतर दोन दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी ते झळकतच आहेत. त्यामुळे हे फलक तात्काळ उतरविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयांना दिले. त्यानुसार शुक्रवारी बॅनर उतरविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यासाठी येणारा खर्च संबंधित मंडळांकडून वसूल करण्यात येईल, असे मोहन अडतानी यांनी स्पष्ट केले.
जाहिरात फलक कायम ठेवणाऱ्या मंडळांना नोटिसा
अनंत चतुर्दशीनंतर मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी जाहिरातींचे फलक उतरविले नाहीत. त्यामुळे मुंबई पुन्हा
First published on: 21-09-2013 at 05:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advertisement boards continue ganesh mandal sent notice