अनंत चतुर्दशीनंतर मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी जाहिरातींचे फलक उतरविले नाहीत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा विद्रुप झाली आहे. परिणामी संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर नोटीस बजावण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवशी मंडप आणि आसपास झळकवलेले फलक काढणे बंधनकारक होते. परंतु गणेश विसर्जनानंतर दोन दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी ते झळकतच आहेत. त्यामुळे हे फलक तात्काळ उतरविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयांना दिले. त्यानुसार शुक्रवारी बॅनर उतरविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यासाठी येणारा खर्च संबंधित मंडळांकडून वसूल करण्यात येईल, असे मोहन अडतानी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा