मुंबई : म्हाडाच्या छ. संभाजीनगर मंडळाकडून नव्या वर्षात छ. संभाजी नगरमधील ११५० घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर नागपूरमधील अंदाजे ४५० घरांसाठीही जानेवारीत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुंबई आणि पुण्यातील घरांसाठी नुकतीच सोडत पार पडली असून या सोडतीतील घरांची ताबा प्रक्रिया सध्या सुरु आहे. तर कोकण मंडळातील ५३११ घरांपैकी २९७० घरांसाठीची सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच सोडतीची नवीन तारीख जाहीर होणार आहे. तेव्हा आता उर्वरित नागपूर, अमरावती, नाशिक, छ. संभाजी नगर आदी मंडळातील उपलब्ध घरांसाठी लवकरात लवकर, जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकतेच संबंधित मंडळांना दिले आहेत. त्यानुसार आता लवकरच उपलब्ध घरांचा शोध घेत जानेवारीत सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा संबंधित विभागीय मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे.

police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया

हेही वाचा – बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आणखी एकाविरोधात म्हाडाकडून गुन्हा दाखल

हेही वाचा – मुंबई : ग्रँटरोडमध्ये रस्त्यावर झाड पडले, बस मार्ग वळवावे लागले

त्यानुसार नागपूरमध्ये अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च गटातील अंदाजे ४५० घरे सोडतीसाठी उपलब्ध आहेत. तेव्हा या घरांसाठी नवीन वर्षात सोडत काढण्यात येणार असून यासाठी जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी महेश मेघमाळे यांनी दिली. तर छ. संभाजी नगर मंडळाकडे ११५० घरांसह भूखंड उपलब्ध असून या घरांसाठीही जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी दिली.

Story img Loader