सीबीआयने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार तयार झाली. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा आणि अंतरिम संरक्षण मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देत तात्पुरतं अटकेपासून संरक्षण दिलं. यानंतर समीर वानखेडेंच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

समीर वानखेडेंचे वकील म्हणाले, “जुहूमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या कारवाईत लहान लहान मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या मुलांवर कलम २७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांना कलम ६२ (अ) नुसार संरक्षण देण्यात आलं होतं. ती मुलं आज त्यांचं आयुष्य व्यवस्थितपणे व्यतीत करत आहेत. त्यामुळे कलम २७ अंतर्गत आरोपीला तुरुंगात जावं लागावं असा गुन्हा नाही.”

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

“त्यांना कलम २७ अंतर्गत गुन्हा रद्द करायचा होता, तर…”

“आर्यन खानवर कलम २७ चा गुन्हा नोंदवण्याला मान्यता मिळाली म्हणजे त्याला काही ना काही आधार असणार. त्याआधारेच डेप्युटी लिगल अॅडव्हायजरने कलम २७ नुसार गुन्हा नोंदवण्यास सांगितलं. त्यांना कलम २७ अंतर्गत गुन्हा रद्द करायचा होता, तर त्यांनी कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून करायला हवा होता,” असं मत वकिलांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला…”, उच्च न्यायालयात व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा खुलासा, शाहरूख खान समीर वानखेडेंना म्हणाला…

“…म्हणून अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली”

“जाणीवपूर्वक तयार केलेल्या गोष्टींच्या आधारे समीर वानखेडेंना अटक करण्यात येईल म्हणून आम्ही न्यायालयाला अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली. याला कोर्टाने मंजूरी दिली. यानुसार २२ मेपर्यंत समीर वानखेडेंना अटक करता येणार नाही. आता २२ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्या दिवशी एनसीबी आपलं प्रतिज्ञापत्र सादर करेल. रविवारी (२१ मे) आम्हाला त्याची प्रत मिळेल. त्याचा अभ्यास करून सुनावणीत आम्ही आमची बाजू मांडू,” असंही वानखेडेंच्या वकिलांनी नमूद केलं.