मुंबई : आफ्रिकेतील मलावी देशातून मलावी हापूस आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टॉमी अटकिन्स जातीचे आंबे मुंबईत दाखल झाले आहेत. डिसेंबरअखेर आंब्यांची आयात सुरू राहणार आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट आणि दिल्लीत किरकोळ विक्रीसाठी आंबे उपलब्ध असणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी येथील आंब्याचे व्यापारी संजय पानसरे म्हणाले, वाशी बाजार समितीत मालावी हापूसचे तीन किलोचे ९४५ बॉक्स आणि टॉमी अटकिन्सचे चार किलोचे २७० बॉक्स बुधवारी वाशी बाजार समितीत दाखल झाले आहेत. हा आंबा मुंबई, पुणे, अहमादाबाद, राजकोट, दिल्ली आदी शहरांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. दर्जानिहाय मालावी हापूसला प्रती बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये आणि टॉमी अटकिन्स प्रती बॉक्स तीन हजार रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज आहे.

maxi cabs in Mumbai
मॅक्सी कॅबसारखी वाहने अधिकृत झाल्यास रस्ते सुरक्षेसाठी धोक्याचे, एसटी महामंडळाची सेवा कोलमडण्याची भिती
maharashtra Health Department launches leprosy and tuberculosis detection campaign in 2025
आरोग्य विभागाची नववर्षात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम!…
Municipal Corporations cleanliness drive
स्वच्छता मोहिमेतून ११.४ मेट्रिक टन कचरा जमा, नववर्षानिमित्त सार्वजनिक ठिकाणांची महापालिकेकडून स्वच्छता
Mahakumbh Mela is held at Prayagraj rail innovative initiative launched to simplify ticketing process
कुंभमेळ्याला गेलेल्या प्रवाशांना कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवरून मिळणार रेल्वेचे तिकीट
Raj Thackeray reaction on Assembly Election
Raj Thackeray: ‘समस्या आली की मनसेची आठवण, पण मतदानावेळी विसर’, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
bmc has taken strict steps on constructions due air quality
वायुप्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत बांधकामावरील निर्बंध कायम, भायखळा परिसराच्या पाहणीअंती भूषण गगराणी यांची स्पष्टोक्ती
Mumbai Traffic
Mumbai Traffic : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला १७,८०० जणांना वाहतूक पोलिसांचा दणका! ‘इतके’ लाख दंड वसूल
Virar police arrested bogus mantrik who raped woman
जहाजांवरील सहा कोटींच्या साहित्याचा अपहार, शिवडी पोलिसांकडून ११ जणांविरोधात गुन्हा
Illegal gutkha worth Rs 21 lakh seized in Ghatkopar Mumbai news
घाटकोपरमध्ये २१ लाख रुपयांचा अनधिकृत गुटखा जप्त, दोघांना अटक

हेही वाचा : तीन भारतीय शास्त्रज्ञांना टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्कार जाहीर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांचा समावेश

दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मालावी हापूस मुंबईत दाखल होत असतो. यंदा मालावीत आंब्याचा हंगाम लांबला आहे, शिवाय उत्पादनातही घट झालेली आहे. त्यामुळे मलावी हापूसची आयात तीन आठवडे उशिराने झाली आहे. आता डिसेंबरपर्यंत नियमित आवक होत राहील. दर आठवड्याला सुमारे सात हजार बॉक्सची आवक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मुंबई : ११ कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एकाला अटक; ३३ डेबिट कार्ड, १२ चेकबुक जप्त

देवगडमधून गेला अन् मलावी हापूस झाला

मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी रत्नागिरीतून कलमे करण्यासाठी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या (काड्या) मलावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून सुमारे २६ एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन आता मलावी देशात सुमारे हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. या आंब्याला मलावी हापूस म्हटले जाते. मलावी हापूस आंबे २०१८मध्ये पहिल्यांदा ४० टन आंबे वाशी बाजार समितीत आले होते. त्यानंतर सातत्याने मलावी हापूस आंब्यांची आवक होत राहिली आहे, असेही पानसरे म्हणाले.

Story img Loader