मुंबई : आफ्रिकेतील मलावी देशातून मलावी हापूस आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टॉमी अटकिन्स जातीचे आंबे मुंबईत दाखल झाले आहेत. डिसेंबरअखेर आंब्यांची आयात सुरू राहणार आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट आणि दिल्लीत किरकोळ विक्रीसाठी आंबे उपलब्ध असणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी येथील आंब्याचे व्यापारी संजय पानसरे म्हणाले, वाशी बाजार समितीत मालावी हापूसचे तीन किलोचे ९४५ बॉक्स आणि टॉमी अटकिन्सचे चार किलोचे २७० बॉक्स बुधवारी वाशी बाजार समितीत दाखल झाले आहेत. हा आंबा मुंबई, पुणे, अहमादाबाद, राजकोट, दिल्ली आदी शहरांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. दर्जानिहाय मालावी हापूसला प्रती बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये आणि टॉमी अटकिन्स प्रती बॉक्स तीन हजार रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज आहे.
दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मालावी हापूस मुंबईत दाखल होत असतो. यंदा मालावीत आंब्याचा हंगाम लांबला आहे, शिवाय उत्पादनातही घट झालेली आहे. त्यामुळे मलावी हापूसची आयात तीन आठवडे उशिराने झाली आहे. आता डिसेंबरपर्यंत नियमित आवक होत राहील. दर आठवड्याला सुमारे सात हजार बॉक्सची आवक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : मुंबई : ११ कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एकाला अटक; ३३ डेबिट कार्ड, १२ चेकबुक जप्त
देवगडमधून गेला अन् मलावी हापूस झाला
मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी रत्नागिरीतून कलमे करण्यासाठी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या (काड्या) मलावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून सुमारे २६ एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन आता मलावी देशात सुमारे हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. या आंब्याला मलावी हापूस म्हटले जाते. मलावी हापूस आंबे २०१८मध्ये पहिल्यांदा ४० टन आंबे वाशी बाजार समितीत आले होते. त्यानंतर सातत्याने मलावी हापूस आंब्यांची आवक होत राहिली आहे, असेही पानसरे म्हणाले.