अक्षय मांडवकर

अंत्यत आकर्षक आणि चकाकणाऱ्या ‘बॉम्बेयाना’ या समुद्री गोगलगायीचे दर्शन सुमारे ७० वर्षांनी सागरी जीवांच्या निरीक्षकांना घडले आहे. ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ या मोहिमेच्या माध्यमातून हाजी अलीच्या खडकाळ  समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेल्या ‘बीच वॉक’च्या दरम्यान ही गोगलगाय आढळली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ

या गोगलगायीचा शोध १९४६ साली मुंबईत लागला होता. मोठय़ा कालावधीच्या खंडानंतर गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या सागरी परिसंस्थेच्या अभ्यासाची चळवळ पुन्हा जोर धरू लागल्याने अशा आकर्षक सूक्ष्मजीवांचा दुर्मीळ ठेवा गवसत आहे.

मुंबई सभोवती पसरलेल्या सागरी परिसंस्थेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ या मोहिमेची फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरुवात झाली. त्याद्वारे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सागरी जीवांच्या निरीक्षणाचे काम चालते. या मोहिमेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या सागरी परिसंस्थेतील अनेक सूक्ष्मजीवांबरोबरच समुद्री गोगलगायींच्या प्रजातींचा नव्याने उलगडा झाला. आजवर मुंबईतील किनाऱ्यांवरून समुद्री गोगलगायींच्या प्रजातींमधील सुमारे १८ प्रजाती प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांचा आकार सुमारे ४ मि.मी. ते काही इंचापर्यंत असू शकतो. मृदू शरीर, विविध आकर्षक रंग आणि शोभिवंत दिसण्यामुळे त्यांना ओळखता येते. खडकाळ किनाऱ्यावरील उथळ पाण्यात या प्रजाती आढळतात.

नोव्हेंबर ते मार्च हा समुद्री शैवाळ, स्पाँज, कोरल आणि हायडॉइड यांचा बहरण्याचा कालावधी असल्याने त्यावर समद्री गोगलगायी उपजीविकेसाठी येतात. त्यामुळे हा काळ त्यांच्या निरीक्षणासाठी उत्तम असतो. गेल्या दोन वर्षांत गोगलगायीच्या १८ प्रजाती ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ मोहिमेतील निरीक्षकांना मरिन ड्राइव्ह, कार्टर रोड, खार दांडा, हाजी अली, जुहू कोळीवाडा येथे आढळल्या आहेत.

पावसाळ्यानंतर प्रथमच हाजी अलीच्या खडकाळ किनाऱ्यावर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘बीच वॉक’ दरम्यान ‘बॉम्बेयाना’ नावाची आकर्षक समुद्री गोगलगाय दिसल्याची माहिती ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’चे प्रदीप पाताडे यांनी दिली. तर ‘बॉम्बेयाना’ या समुद्री गोगलगायीचा शोध १९४६ साली अभ्यासक विंकवर्थ यांनी लावल्याची माहिती समुद्री गोगलगायीचे अभ्यासक विशाल भावे यांनी दिली. या प्रजातीचा शोध मुंबईत लागल्याने ही प्रजात ‘बॉम्बेयाना’ नावाने ओळखली जाऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ मुंबईतच नव्हे तर रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर देखील ही प्रजाती आढळल्याचे ते म्हणाले. मुंबईत मोठय़ा कालावधीनंतर किनाऱ्यांवरील सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणाचे काम सुरू झाल्याने समुद्री गोगलगायीसारख्या छोटय़ा जीवांचे बऱ्याच वर्षांनी पुन्हा दर्शन घडत असल्याचे भावे यांनी सांगितले.

बॉम्बेयानाची गुणवैशिष्टय़े

समुद्री गोगलगायीची ही प्रजात खडकाळ समुद्रकिनाऱ्यांलगत आढळते. मूळ रंग पांढरा असून त्यावर चकाकी असते. शरीराची कडा आकर्षक केशरी असून शरीरावर जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. श्वसनेंद्रियांवर चंदेरी ठिपके असतात. पाय हे आखूड असतात. ही प्रजात आकाराने साधारण १६ मि.मी. असते. महाराष्ट्राच्या किनाऱ्यासह गुजरातमध्ये आढळणारी ही दुर्मीळ प्रजाती असल्याची नोंद ‘सी स्लग ऑफ इंडिया’ या पुस्तकात करण्यात आली आहे.

Story img Loader