लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत जाहीर होणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाने तब्बल ७८ दिवसांनंतर उन्हाळी सत्राअंतर्गत पदव्युत्तर विधि शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. या परीक्षेत एकूण २४.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उन्हाळी सत्राअंतर्गत पदव्युत्तर विधि शाखेची (दोन वर्षीय अभ्यासक्रम) द्वितीय सत्र परीक्षा २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण २ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ७७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते आणि १ हजार ३३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

आणखी वाचा-मुंबई : आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या

निकाल विलंबामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत होऊन भविष्यात उच्च शिक्षण व नोकरीच्या संधींना मुकावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती. अखेर शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 78 days the results of second session of post graduate law examination have been announced mumbai print news mrj
Show comments