“मी हा पुरस्कार सर्व देशवासीयांना समर्पित करतो. ज्याप्रकारे लतादीदी सर्वांच्या होत्या, त्याचप्रकारे त्यांच्या नावाने दिला गेलेला हा पुरस्कार देखील सर्वांचा आहे.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) ‘लता दिनानाथ मंगेशकर’ स्वीकारल्यानंतर बोलून दाखवलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर आज मुंबईतील षण्ङमुखानंद सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी भाषणात लतादीदींच्या आठवणींनी उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदीं भावूक झाल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा नेते विनोद तावडे आदींची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “संगीत एक साधना आणि भावना आहे. जे अव्यक्त आहे, त्याला व्यक्त करण्याचे शब्द आहे. संगीत तुम्हाला राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यबोधाच्या शिखरावर पोहचवू शकते. मी सहसा कोणते पुरस्कार घेत नाही, पण जर पुरस्कार लतादीदींच्या नावानं आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून असेल तर इथे येणं माझं कर्तव्य होतं. आपण सर्वजण नशीबान आहोत की संगीताचे सामर्थ, शक्तीला लतादीदींच्या रुपात आपण पाहीलं. मंगेशकर परिवार पिढ्यांपिढ्या या यज्ञात आपली आहुती देत आलं आहे. माझ्यासाठी तर हा अनुभव खूप मोठा राहिला आहे.”

तसेच, “जवळपास चार-साडेचार दशकं झाली असतील, लतादीदींशी माझा परिचय सुधीर फडकेंनी करून दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत या परिवारासोबतचे अपार प्रेम आणि असंख्य घटना या माझ्या जीवानाचा भाग बनल्या आहेत. माझ्यासाठी लतादीदी स्वरसम्राज्ञी बरोबच जे सांगताना मला गर्व वाटतो, त्या माझ्या मोठ्या बहीण होत्या. त्यांच्याकडून मला नहेमीच मोठ्या बहिण्याचं प्रेम मिळालं. मी समजतो या पेक्षा मोठं आयुष्याचं सौभाग्य काय असू शकतं. खूप दशकानंतर हा पहिला राखीचा सण असेल जेव्हा दीदी नसेल. मी त्यांचा खूप आदर करायचो, मात्र त्या नेहमी सांगायच्या माणूस आपल्या वयाने नाही तर कार्याने मोठा होतो. जो देशासाठी जेवढं करेल तो तेवढाच मोठा आहे. यशाच्या शिखरावर असताना अशा प्रकारचा विचार पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या महानतेचा अनुभव येतो. लतादीदी वयाने आणि कर्माने देखील मोठ्या होत्या. लतादीदींनी संगीतात ते स्थान मिळवलं होतं की लोक त्यांना देवी सरस्वतीचं प्रतीरुप मानत होते. त्यांच्या आवाजाने जवळपास ८० वर्षे संगीत जगतात आपला ठसा उमटवला.” असंही यावेळी मोदींनी बोलून दाखवलं.

Story img Loader