मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार) संघटनात्मक बदलाच्या चर्चेने जोर धरला होता. पण, तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बदलावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर तुर्तास जयंत पाटील कायम राहण्याची शक्यता आहे.

संघटनेतील मोठे बदल टाळून राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदांवर तातडीने नेमणुका करण्यासाठी विभागनिहाय प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रभारींनी पुढील पंधरा दिवसांत संबंधित जिल्ह्यांत दौरे काढून, रिक्त जागी नेमणुका करून आपले अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर करावयाचे आहेत. राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली आहे.

विभागनिहाय प्रभारी असे

विदर्भ – अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे.

मराठवाडा – राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर.

पश्चिम महाराष्ट्र – हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे.

उत्तर महाराष्ट्र – हर्षवर्धन पाटील.

कोकण – जितेंद्र आव्हाड, सुनिल भुसारा.

Story img Loader