Mumbai Municipal Corporation Election Budget 2024- 2025 : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या (कोस्टल रोड) दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम प्रगतीपथावर असून येत्या १८ फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केली. मुंबई महापालिकेचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी लोकसभेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसारच कोस्टल रोड प्रकल्पाबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

कोस्टल रोडी मार्गाची लांबी १०.५८ किमी आहे. त्यापैकी ९ किमीचा मार्ग दक्षिण मुंबईमध्ये आहे. या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात आले. बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली होती. पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले होते. १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू असताना झालेल्या यंत्र बिघाडामुळे बोगदा खणण्यास उशीर झाला होता. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे. भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ या टीबीएम संयंत्राच्या सहाय्याने बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.जानेवारीपर्यंत दक्षिण दिशेच्या मार्गिकांची सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, आता यासाठी फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या फेजचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुसरा फेज मे महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इक्बालसिंग चहल यांनी दिली.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Raj Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “शाहरूख-सलमानचे चित्रपट शुक्रवारी पडले तरी…”, राज ठाकरेंची गुहागरमध्ये टोलेबाजी!

हेही वाचा >> BMC Budget 2024 Live: मुंबई पालिकेला महसूल उत्पन्नाच्या स्रोतातून किती निधी मिळाला?

ऑक्टोबर २०१८ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. हा प्रकल्प प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा ठरला. न्यायालयीन स्थगितीमुळे व टाळेबंदीमुळे या प्रकल्पाची अंतिम मुदत वारंवार वाढवण्यात आली होती. नंतर वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून दिल्यामुळे कालावधी वाढला होता.

कोस्टल रोडसाठी २९००.९७ कोटींची तरतूद

मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) दक्षिण पॅकेज १,२ आणि चारची सर्व कामे प्रगतीपथावर असून २४ डिसेंबर २०२३ पर्यंत ८३.३४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली. पॅकेज चारमधील बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून आंतरबदलाचे पॅकेज १ मधील ९९ टक्के आणि पॅकेज २ मधील ६९ टक्के काम पूर्ण झाले आहे. वरळी कोळीडावाड येथील कोळी बांदवांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या निर्देशानुसार समिती नियुक्त केली होती, व समितीच्या अहवालानुसार दोन खांबांमधील अंतर ६० मीटरवरून १२० मीटकर करण्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधवांना मच्छिमारीकरता समुद्रात ये-जा करणे सुलभ होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचा भाग फेब्रुवारी २०२४ पासून सुरू करण्याचा प्रयत्न असून मे २०२४ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे निर्धार करण्यात आला आहे. २०२३-२४ च्या सुधारित अंदाजात ३ हजार कोटी आणि सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २९०० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित आहे.

हेही वाचा >> BMC Budget 2024 : मुंबईचा अर्थसंकल्प १०.५० टक्क्यांनी वाढला, पायाभूत सुविधांसह विकासकामांसाठी भरघोस तरतूद!

वेगमर्यादा वाढणार, वेळ वाचणार

या मार्गावर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावू शकतात. मात्र या मार्गावर ताशी ७० ते ८० किमी वेगमर्यादा असेल. संपूर्ण मुंबईतील इतर रस्त्यांची वेगमर्यादा ताशी २१ किमी असताना सागरी किनारा मार्गावरील वेगामुळे वेळेची ७० टक्के बचत होणार आहे. तर इंधनात ३४ टक्के बचत होईल असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.