मुंबई : फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहुल लागली असून मुंबईत रविवारीपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली नोंदले गेले,तर सांताक्रूझ केंद्रात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे १३.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. प्रथमच मुंबईत २० अंशाखाली किमान तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान रविवारच्या तुलनेत ३.५ अंशांनी कमी आहे. सांताक्रूझ येथे प्रथमच मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सांताक्रूझ केंद्रात अनकेदा किमान तापमानाचा पारा १५-१९ अंशावर पोहोचला होता‌. मात्र, कुलाबा केंद्रात संपूर्ण नोव्हेंबर महिना किमान तापमान २०-२५ अंश इतके नोंदले गेले होते. दरम्यान, या संपूर्ण आठवड्यात किमान तापमानातील घट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा…मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने राज्यात पुन्हा गारठा वाढू लागला आहे. राज्यात किमान तापमानात घट होण्याचा आणि थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिकमध्ये सोमवारी सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पुणे येथे १२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे १३.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा…कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाचा तूर्तास प्रस्ताव नाही

कमी दाबाचे क्षेत्र होणार ठळक

विषुवृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात शनिवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली आज ठळक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे‌. हे प्रणाली बुधवारपर्यंत तामिळनाडू आणि श्रीलंका किनाऱ्याकडे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After cyclone fengal mumbais weather turned cold with temperatures dropping since sunday mumbai print news sud 02