दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या चार तरुणींनी उलटा पोलिसांवरच हात उगारल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. दारुच्या नशेत धुंद  असलेल्या या तरुणींनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास भाईंदर येथील मैदानात गोंधळ घातला. पोलीस या तरुणींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी उलटा पोलिसांवरच हल्ला केला. या प्रकरणी तिघींना अटक करण्यात आली असून एक तरुणी फरार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ममता मेहर (२५), आलिशा पिल्लाई (२३), कमल श्रीवास्तव (२२) आणि जस्सी डिकोस्टा (२२) अशी या आरोपी तरुणींची नावे आहेत. या चौघींनी मीरारो़ड येथे पार्टी केली व रात्री दोनच्या सुमारास त्या भाईंदरमधील शहीद भगतसिंग मैदानात पोहोचल्या. तिथे त्यांचे आपसात जोरदार भांडण सुरु झाल्यानंतर गर्दी जमा झाली. गोंधळ वाढल्यामुळे रात्रीच्या गस्तीवर असणारे तीन पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा पाटीलही होत्या.

पोलीस या तरुणींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसांनाच शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिघींना पोलिसांना अटक केली असून डिकोस्टा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. या चौघीपैकी फक्त डिकोस्टा एकटी नालासोपारा येथे राहते. अन्य तिघी मीरा रोड येथे रहायला आहेत. पोलिसांनी या चौघींविरोधात कलम ३५३, ३३२ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.