२६ जुर्लेसारख्या महावृष्टीची पूर्वकल्पना मिळावी यासाठी बऱ्याच प्रयत्नाने मुंबई वेधशाळेत २०११मध्ये आणले गेलेले डॉप्लर रडार अखेर चार वर्षांनी येत्या नोव्हेंबर रोजी अधिकृतरित्या सेवेत दाखल होत आहे. सुमारे ३५० कोटी रुपये खर्च झालेल्या या रडारचे आयुर्मान दहा वर्षांचे आहे.

हे रडार लावण्यासाठी मुंबईत जागेचा शोध सुरू होता. मात्र कोणते ही अडथळे येऊ न देता समुद्रात ५०० किमी अंतरापर्यंत पाहणी करण्यासाठी रडार योग्य उंचीवर बसवणे आवश्यक होते. ही जागा मिळत नसल्याने अखेर पुर्वीच्या रडारच्या जागी म्हणजे नौदलाच्या कुलाबा येथील अर्चना इमारतीवर ही जागा निश्चित करण्यात आली. मात्र नौदलाने चिनी डॉप्लरला विरोध केल्याने अखेर दोन वर्षांनी भेल या भारतीय बनावटीचे रडार मुंबईत आणले गेले.
हे रडार २०१२पासून कार्यरत असले तरी त्यात अनेक तांत्रिक त्रुटी असल्याने वेध शाळेकडून तिचा ताबा घेतला गेलेला नव्हता. डॉप्लर अशा वादळांची बारकाईने पहाणी करू शकत असल्याने हवामान विभागासाठी ते आवश्यक आहे.
‘चोपोला’चा धोका नाही
अरबी समुद्रात सध्या चोपोला हे चक्रवर्ती वादळ घोगावत असून ते ओमेनच्या दिशेने जात आहे. या वादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नाही. मात्र वादळामुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून त्यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे.

Story img Loader