लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: वास्तुकला व स्थापत्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उद्यानांशी निगडीत रचना, आराखडे, मांडणी आदिंविषयी माहिती मिळावी, या हेतूने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) बुधवारी प्रभादेवी येथील रचना संसद अकॅडेमी ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे अनेक वर्षांनंतर राणीच्या बागेत प्रथमच या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ६० विद्यार्थी व प्राध्यापक या अभ्यासदौऱ्यात सहभागी झाले होते.

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल

अभ्यासदौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थांना राणीच्या बागेतील लँडस्केपिंगबाबत अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, १६० वर्षांपासून जतन केलेली वाटिका पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. डॉ. देव आणि डॉ. अभिषेक यांनी उपस्थितांना प्राणीसंग्रहालयाची इत्यंभूत माहिती दिली. तसेच उद्यानात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, जॅपनीज गार्डन, मियावकी वृक्ष लागवड आदींची परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विद्यार्थ्यांना माहिती दिली.

आणखी वाचा-अकरावी प्रवेश: तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; एकूण १३ हजार ४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले

विद्यार्थ्यांनी केवळ उद्यानांच्या नागरी कामांवर भर न देता उद्यानातील माती, रोपे याचाही अभ्यास करावा, असे आवाहन जितेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना केले. अभ्यास दौऱ्याला रचना संसद महाविद्यालयाचे प्राध्यापक धरा शाह, स्वाती देसाई, धारा पांचाळ, स्नेहल गायकवाड आणि मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.