लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : केईएम, शीव, नायर, कूपर या मुख्य रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये नव्याने भरती केलेल्या ६०० परिचारिकांबरोबरच आता आरोग्य केंद्रामध्ये रूजू झालेल्या ३२५ सहाय्यक परिचारिकांचे वेतन रखडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या परिचारिकांनी जानेवारीमध्ये वेतन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Medical Council election 2025 news in marathi
‘एमएमसी’ निवडणुकीत सावळागोंधळ; १४ दिवस उलटल्यानंतरही उमेदवार अर्जाविनाच
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
US-based company shuts down without notice Mass layoffs
Mass layoffs : अमेरिकेतील कंपनीने पूर्वसूचना न देता गुंडाळलं भारतातील कामकाज! हजारो कर्मचार्‍यांना मिळाले नोकरीहून काढल्याचे ईमेल
pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
akola reports 5 suspected cases of guillain barre syndrome
सावधान! ‘जीबीएस’ची अकोल्यात धडक, पाच रुग्ण आढळले; एक रुग्ण व्हेंटिलेटरवर
Neelam Gorhe, 8 class Pass Method ,
आठवीपर्यंत नापास न करणारे सरकार जनतेकडून नापास; डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका

मुंबई महानगरपालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांचा कणा असलेल्या सहाय्यक परिचारिका प्रसविका यांची अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत होता. करोना काळामध्ये हा परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये सहाय्यक परिचारिका प्रसविका यांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला. रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून जुलमध्ये शहरातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये ३२५ सहाय्यक परिचारिका प्रसविकांची भरती करण्यात आली.

आणखी वाचा-कार्यालयात बसून समस्यांचे निराकरण अशक्य, पालिका आयुक्तांनी केली अभियंत्यांची कान उघडणी

सहाय्यक परिचारिका प्रसविकांच्या भरतीमुळे आरोग्य केंद्रामधील आरोग्य सेवा सुरळीत करणे शक्य झाले. मात्र या नव्याने भरती करण्यात आलेल्या ३२५ सहाय्यक परिचारिका प्रसविकांचा सांकेतांक क्रमांक तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून त्यांना वेतन मिळू शकलेले नाही. याबाबत सहाय्यक परिचारिका प्रसविकांनी प्रशासनाकडे वारंवार विचारणा केली. मात्र सांकेतांक क्रमांक तयार झाला नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने कामावर रूजू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आरोग्य केंद्रामध्ये रूजू झालेल्या बहुतांश सहाय्यक परिचारिका प्रसविका महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे काही सहाय्यक परिचारिका मुंबईमध्ये भाड्याने घर घेऊन राहत आहेत. त्यांना घराचे भाडे भरणे शक्य झालेले नाही. त्यामुळे घर मालक त्यांना घर रिकामे करण्यास सांगत आहेत. काही जणी आपल्या नातेवाईकांकडे राहत आहेत, मात्र त्यांना दररोज कामावर ये-जा करण्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जणी गावाहून पैसे मागवून कसाबसा आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये कायमस्वरुपी नोकरी लागल्याने काही जणी सहकुटुंब मुंबईत स्थलांतरित झाल्या आहेत. पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-रेल्वे परिसरात हरवलेल्या ५३८ मुले स्वगृही रवाना

सलग पाच महिने वेतन न झाल्याने ३२५ सहाय्यक परिचारिका प्रसविका संतप्त झाल्या आहेत. वेतन तातडीने द्यावे, अशी विनंती ३२५ परिचारिकांनी दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून मुबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना केली आहे. तसेच जानेवारीपर्यंत वेतन न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिल्याची माहिती दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली.

Story img Loader