Death Threat to Shahrukh Khan: बॉलिवुड अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाची जबाबदारीही बिश्नोई गँगने घेतली असून सलमान खानला त्यातून संदेश देण्याचा गँगचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. अशी पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. आता सलमान खानपाठोपाठ अभिनेता शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही धमकी बिश्नोई गँगकडून आल्याची अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती नसून तशी शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख खानला फोनवर जीवे मारण्याची धमकी आली आहे. याआधी सलमान खानला असा धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण जेलमधील लॉरेन्स बिश्नोईचे भाऊ असल्याचं सांगितलं होतं. आता शाहरूख खानला धमकी देण्यामागे नेमकं कोण आहे? किंवा हा कुणाचा चेष्टा-मस्करी करण्याचा प्रयत्न आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी

“आम्हाला असं वाटतंय की हा धमकीचा फोन अज्ञात क्रमांकावरून करण्यात आला होता. त्यामुळे कुणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असा आमचा अंदाज आहे. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमण्यात आलं आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या महिन्यात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने २ कोटींची खंडणी मागितली होती. नंतर या प्रकरणात वांद्रे परिसरातून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.

योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी

दरम्यान, आठवड्याभरापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देणारा फोन मुंबई वाहतूक पोलिसांच्या क्रमांकावर आला होता. योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसांत राजीनामा दिला नाही, तर त्यांचीही अवस्था बाबा सिद्दिकींप्रमाणेच करू, असं या कॉलमध्ये म्हटलं होतं. १२ ऑक्टोबरला वांद्रे परिसरातच बाबा सिद्दिकींची बिश्नोई गँगकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

त्यांची हत्या झाल्यापासून त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी व सलमान खान या दोघांना धमकी देणारे फोन येत आहेत. यातले अनेक फोन हे कुणाचातरी खोडसाळपणा असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.