मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमकीचा संदेश पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याची घटना ताजी असताना आता मुंबई पोलिसांना आणखी एक धमकीचा संदेश आला आहे. त्यात, योगी यांचा मृत्यू बाबा सिद्दीकी यांच्यासारखा झाला, तर जगाच्या नकाशावर भारताची अवस्था हमास आणि इस्त्राईलसारखी होईल, असे म्हटले आहे. रविवारी रात्री उशीरा हा संदेश वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला होता. त्यात, योगी यांनी १० दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही, तर त्यांना बाबा सिद्दीकी यांच्यासारखे ठार करू, असे धमकावण्यात आले होते. या संदेशानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर, तात्काळ गुन्हे शाखा, दहशतवादी विरोधी पथक व इतर यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली व संदेश पाठवण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांना संदेश पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला. त्यावेळी, मोबाईल क्रमांकाच्या आधारे उल्हासनगर येथून आरोपी तरूणीला ताब्यात घेण्यात आले. ही तरुणी तंत्रज्ञान शाखेची पदवीधर आहे. तिची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे तिने नैराश्येतून ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर आता रविवारी रात्री उशिरा वाहतूक पोलिसांना आणखी एक संदेश आला आहे. त्यात, योगी यांचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर जगाच्या नकाशावर भारत हमास आणि इस्त्राईलसारखा होईल, म्हटले आहे. हिंदीमध्ये आलेल्या या संदेशाची माहिती गुन्हे शाखेला देण्यात आली आहे.
हेही वाचा…कांदिवली औद्योगिक वसाहतीचा ११६ एकर भूखंड परत घेण्याचे आदेश, उच्च न्यायालयाकडून तूर्त अंतरिम
यापूर्वीही वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला असे धमकीचे संदेश आले आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्व येथे गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान याला दोनवेळा धमकीचे संदेश आले होते. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षांच्या भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचून वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. तसेच, आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातही धमकी देणाऱ्याला नुकतीच अटक करण्यात आली. आरोपीने झिशान सिद्दीकीसोबत सलमानलाही धमकावले होते.
हेही वाचा… लंडनमधील मैत्रिणीकडून वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक
वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअॅप क्रमांकावर मंगळवारीही धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. आरोपीने दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी वांद्रे पश्चिमेकडून ५७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती.