मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती विसर्जनावरून निर्माण वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यासह काही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन करू न देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने माघी गणेशोत्सवात घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा मंगळवारी मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित करण्यात आला. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या आदेशाची पोलीस व अधिकारी अंमलबजावणी करीत नाहीत. मात्र मूर्तींवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात निर्माण होणारा संभाव्य पेच लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे तातडीने पुन्हा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.