दलितांवर अत्याचार आणि हत्यांचे प्रकार वाढत असल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला असून सरकारने त्यांची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. हे दोन्हीही नेते खर्डा (जि. नगर) येथे दलित तरूणाच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी त्यांनी केली असून वाढत चाललेल्या या घटना न रोखल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भय महाराष्ट्र!
एका प्रेमप्रकरणातून नितीन आगे या दलित समाजातील तरुणाची मुलीच्या कुटुंबियांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना निषेधार्ह असून या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आपण गुरूवारी खर्डा येथे जाणार आहोत, असे रामदास आठवले म्हणाले. समाजातील जातीयता संपुष्टात येण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळायला हवे, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती. आंतरजातीय तरूण-तरूणी एकत्र आल्याने समाज एकत्र होऊ शकतो. त्यामुळे ही अभिमानाची बाब असताना त्याला विरोध करणाऱ्यांनी हत्येचे पाऊल उचलणे चुकीचे आहे. या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
गेल्या वर्षभरात सामाजिक बहिष्कार, हत्या, दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून सरकारने अधिक गंभीर होऊन कारवाई केली पाहिजे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन समाजप्रबोधनाचे कामही केले पाहिजे, असे आठवले यांनी नमूद केले.
दलित समाज काँग्रेसऐवजी महायुतीकडे वळल्याने पुढील काळात या घटनांमध्ये वाढ होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मंगल कलशाभोवतीचे अमंगल
आंदोलन तीव्र करणार-आंबेडकर
दलितांवरील अत्याचार आणि हत्येची नगर जिल्ह्य़ातील गेल्या सहा महिन्यातील ही चौथी घटना आहे. सत्तेतून आलेली मस्ती आणि आरोपींवर कारवाई करण्यात पोलिसांची दिरंगाई हे याला कारण असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. आंबेडकर ३ मे रोजी खर्डा येथे जाऊन दलित तरुणाच्या कुटुंबियांची विचारपूस करणार आहेत. तरुणाची हत्या नियोजनपूर्वक झाली नसल्याचे वक्तव्य नगर जिल्ह्य़ातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केले आहे. मारहाण करून फासावर लटकावले असताना या अधिकाऱ्याने असे वक्तव्य कसे केले, याची चौकशी करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. दलित अत्याचारांविरोधात आम्ही आंदोलने करीत असताना सरकार फारसे गंभीर नाही. त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2014 रोजी प्रकाशित
दलितांवरील अत्याचारांमुळे संतापाची लाट
दलितांवर अत्याचार आणि हत्यांचे प्रकार वाढत असल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला असून सरकारने त्यांची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. हे दोन्हीही नेते खर्डा (जि. नगर) येथे दलित तरूणाच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-05-2014 at 04:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aggravation wave on dalit atrocities in maharashtra