लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर परिसरातील काही गुजराती पाट्यांची दोन दिवसांपूर्वी मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी तोडफोड केली होती. याबाबत मंगळवारी भाजपचे काही नेते आणि गुजराती बांधवांनी घाटकोपर परिसरात आंदोलन करीत मनसे आणि शिवसेनेचा निषेध केला.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray bhivandi
Raj Thackeray Health Update : “माझी प्रकृती नाजूक…”, राज ठाकरेंनी दोन मिनिटांत आटोपलं भाषण!
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”

काही वर्षांपूर्वी एका माजी नगरसेवकाने घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील एका उद्यानाजवळ ‘मारो घाटकोपर’ असा फलक लावला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी या फलकांची तोडफोड केली आणि तेथे मराठी फलक लावले. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही सोमवारी रात्री परिसरातील काही गुजराती फलकांची तोडफोड केली.

आणखी वाचा-मुंबईः कुलगुरूंच्या नावामुळे महिलेचे बिंग फुटले; खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे महिला लंडनला जात होती

या घटनेनंतर घाटकोपर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घाटकोपरमधील भाजप नेते आणि गुजराती नागरिकांनी मंगळवारी आंदोलन करीत शिवसेना आणि मनसेचा निषेध केला. तसेच महानगरपालिकेने तत्काळ हे फलक पुन्हा लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.