पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने कारवाईची धमकी देऊन अहमदाबादमधील एका तरूणीच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेऊन या तरूणीला कारवाईची भीती दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : महिला पोलिसांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Baba Siddiqui murder, dominance, Mumbai Police Crime Branch, charge sheet,
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा

अहमदाबाद येथील रहिवाशी असलेल्या ३१ वर्षीय तरुणीची याप्रकरणी फसवणूक झाली आहे. तिचे पती उच्च न्यायालयात वकिल आहेत, तर ती अभियंता आहे. तक्रारदार गोरेगावमधील एका खासगी कंपनीत २०१८ पासून उपाध्यक्ष पदावर नोकरीला आहे. महिन्यातून चार ते पाच वेळा कामानिमित्त तिला मुंबई यावे लागते. तक्रारीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी ती कामानिमित्त कंपनीत आली होती. कंपनीमध्ये काम करीत असताना ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास एक दूरध्वनी आला. आपण फेडेक्स इंटरनॅशनल कुरियरमधून बोलत असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. आधार कार्डच्या गैरवापराबाबत तक्रार केल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा >>> १४ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक गोव्यात दाखल; गोव्याचे माजी मंत्री गुन्ह्यात आरोपी

पुढे आरोपीने सायबर कार्यालयातून आपण प्रदीप सावंत बोलत असून अंधेरी कार्यालयात काम करीत असल्याचे ओळखपत्र तिला पाठवले. सायबर क्राइमचे वरिष्ठ अधिकारी डीसीपी मिलिंद भारांबे बोलत असल्याचे सांगून एकाने दूरध्वनी केला. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी ओळखपत्रही पाठवले. तसेच बँकांमध्ये किती खाती आहेत याबाबत चौकशी केली. त्यानंतर, ९८८८७ हा कोड पाठवून एवढी रक्कम पाठवल्यास खात्यातील रक्कम कायदेशीर आहे किंवा नाही हे सांगतो असे आरोपीने सांगितले. पुढे अशाच पद्धतीने विविध कारणे पुढे करीत ५ लाख ८५ हजार रुपये देण्यास तरुणीला भाग पाडले. रात्री घडलेला प्रकार पतीला सांगताच असे कुठलेही अधिकारी पैसे पाठवायला सांगत नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे संशय आल्याने तरुणीने वनराई पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहे.

Story img Loader