विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि बिभत्सपणाचे दर्शन घडविणाऱ्या ‘एआयबी नॉक आऊट’ या कार्यक्रमाचा व्हिडीओ युटय़ुबवर काढून टाकण्यात आला आहे. या व्हिडिओवर राजकीय पक्षांसह अनेकांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर तो यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर तातडीने ही कार्यवाही करण्यात आली.
‘एआयबी’ कार्यक्रम बंद करा अन्यथा कायदा हातात घेऊ- जितेंद्र आव्हाड
यूटय़ूब चॅनलवर कुणीही आपले व्हिडीओ अपलोड करू शकतात. तन्मय भट, गुरसिमरन खांबा, रोहन जोशी, अबिश मॅथ्यू हे अशाच पद्धतीने यु टयुबवर चॅनलवर विनोदी व्हिडियो टाकत असतात. २० डिसेंबर रोजी वरळीत त्यांनी मुंबईत एक धर्मदाय कार्यक्रम आयोजित केला होता. एआयबी नॉकआऊट असे या कार्यक्रमाचे नाव होते. अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग या कार्यक्रमात होते तर दिग्दर्शक करण जोहर परीक्षकाच्या भूमिकेत होता. या कार्यक्रमात दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट आदी सिनेकलावंतांची उपस्थिती होती. या शो मध्ये अक्षरश अश्लील शब्दांचा भडीमार करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे तिकीट प्रत्येकी ४ हजार रुपये होते आणि त्यांना ४० लाखांचा निधी मिळाला होता.
सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
नुकतेच या कार्यक्रमाचे तीन एपिसोड यूटय़ूब चॅनलवर अपलोड करण्यात आले.एका संघटनेने साकीनाका पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दिली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा