५८वर्षीय बिजली हत्तीणीचे आज (रविवारी) अखेर निधन झाले. पहाटे ५.५८ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. गेले दोन दिवस बिजलीची तब्येत जास्तच खालावली होती आणि शनिवारपासून तिच्यावर चाललेल्या उपचारांना प्रतिसाद देणेही बंद केले होते. याच महिन्यात बिजली मुलंड येथील औद्योगिक परिसरात कोसळून पडल्याने जखमी झाली होती. तिच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला उभेसुद्धा राहता येत नव्हते. त्याचबरोबर तिच्या अन्य आजारांमुळे ती त्रस्त होती. काही प्राणी मित्र संघटनांच्या मदतीने बिजलीवर पशूतज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार चालू होते.
मेगास्टार अमिताभ बच्चने टि्वटरवरून बिजलीच्या मदतीसाठी आवाहन केले होते. बिजली ही लग्नसोहळ्यात आणि इतर मंगल सोहळ्यात वापरली जाणारी हत्तीण होती.

Story img Loader