लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित लोकल सुरू आहेत. या लोकल फेऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. मात्र, वातानुकूलित लोकलमध्ये सामानाचा (लगेज) डबा नसल्याने डबेवाल्यांना याचा फटका बसत आहे. अशीच परिस्थिती मोनो आणि मेट्रोबाबत असल्याने भविष्यात डबेवाल्यांना वेळेत डबा पोहचवणे कठीण होणार आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाने, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वातानुकूलित लोकल आणि मोनो, मेट्रोमध्ये सामानाच्या डब्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल धावत आहेत. येत्या काळात सर्वाधिक वातानुकूलित लोकल धावणार आहेत. मात्र, या वातानुकूलित लोकलला सामानाचा डबा नसल्याने डबेवाले, फेरीवाले, अवजड सामग्री घेऊन जाणाऱ्यांना वातानुकूलित लोकलचा वापर करता येत नाही. त्यामुळे डबेवाले, फेरीवाल्यांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळी गर्दीच्यावेळी वातानुकूलित लोकलची संख्या वाढवली, तर त्याचा मोठा फटका डबेवाल्यांना बसू शकतो. सकाळी ९-१० वाजता डबेवाला घरून डबा घेऊन दुपारी १२ वाजेपर्यंत डबा कार्यालयात पोहचवतो. मात्र, यावेळी जर वातानुकूलित लोकलची संख्या वाढवली तर, या लोकलला सामनाचा डबा नसल्यामुळे डबेवाला स्थानकात वेळेत पोहचला तरी वातानुकूलित लोकलने प्रवास करू शकत नाही. त्यामुळे वातानुकूलित लोकलमध्ये सामानाचा डबा असावा, अशी मागणी डबेवाल्यांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-‘जी-२०’ प्रतिनिधींसाठी बेस्टची खास बस सेवा; सेवा वापरण्यासाठी मुंबईकरांना प्रेरणा

वेळेच्या अचूक नियोजनामुळे डबेवाल्यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. लोकलच्या वेळेवर डबेवाल्यांचे नियोजन ठरलेले असते. मात्र, वेळेचे गणित चुकल्यास डबेवाल्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसेच वर्सोवा-घाटकोपर मेट्रो एकमध्येही सामानाचा डबा नसून ठराविक लांबी, रुंदी, वजनाचे सामान नेण्यास परवानगी आहे. परिणामी डबेवाले डबे घेऊन प्रवास करू शकत नाहीत.

सध्या मेट्रोला पुढे आणि मागे सामान डबा जोडणे आवश्यक आहे, असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.