मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल सुरुवातीला कमी प्रवासी संख्येमुळे ‘पांढरा हत्ती’ ठरला होता. आता प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असताना त्याच प्रमाणात मनस्तापही वाढला आहे. सोमवारी गर्दीमुळे कल्याणमध्ये लोकलचे दरवाजे बंद झाले नाहीत. त्यामुळे वेळापत्रक विस्कळित झाले. महिनाभरातील वातानुकूलित लोकल बिघडण्याची ही तिसरी घटना आहे.

मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास सीएसएमटीला जाणारी वातानुकूलित लोकल पूर्णपणे भरून गेली. अनेक प्रवासी दाराजवळ लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे लोकलची दारे बंद होण्यास अडचण निर्माण झाली. बराच वेळ लोकल स्थानकात थांबविण्यात आली. परिणामी इतर गाडय़ांची सेवा २०-२५ मिनिटे उशिराने सुरू होती. यासंदर्भात प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले. या घटनेविषयी अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

elephant loksatta news
बेळगांव खानापूरमध्ये हत्ती पकड मोहीम, तर महाराष्ट्रात दोडामार्ग-चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
passenger and memu special trains running from cr bhusawal division of operated with regular numbers
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकिट प्रवाशांची संख्या अधिक असण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र लोकलमधील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आरपीएफकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बिघाडांची मालिका

  • १२ जून : कांजूरमार्ग स्थानकादरम्यान बदलापूर-सीएसएमटी जलद वातानुकूलित लोकलचे ‘ब्रेक बाइंिडग’ झाल्याने चाके रूळांवरून व्यवस्थित धावू शकत नव्हती. यामुळे या लोकलसह १४ लोकलचे वेळापत्रक विस्कळीत
  • ५ जून : दुपारी १२.२० वाजता विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड
  • २४ मे : सकाळी ७.५६ वाजताच्या विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यांतील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड
  • २१ एप्रिल : सकाळी ७.१५ च्या विरार-चर्चगेट लोकल रेकमध्ये तांत्रिक बिघाड
  • २१ एप्रिल : सकाळी ८.३५ वाजेची विरार-चर्चगेट लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा बंद

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडील बोटावर मोजण्याइतक्या वातानुकूलित लोकल नव्या आहेत. मात्र तरीही दरवाजे न उघडणे, लोकलमध्ये गारवा न जाणवणे अशा अडचणी वारंवार उद्भवतात. प्रवासी उभे राहिल्याने दरवाजे बंद होत नाहीत. परिणामी, इतर प्रवाशांचा मात्र खोळंबा होतो. यावर दोन्ही रेल्वे प्रशासनांनी योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे. – मधू कोटीयन, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

Story img Loader