आज येणार, पुढील महिन्यात येणार, चर्चगेटला आली अशा विविध अफवा उठूनही मुंबईकरांना सतत हूल देणारी वातानुकुलित गाडी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यासाठी आता मार्च २०१५ उजाडणार आहे. या गाडीची बांधणी अद्यापही झालेली नसून विद्युत उपकरणांच्या कमतरतेमुळे हे काम रखडले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात ही उपकरणे चेन्नई येथील कोचिंग फॅक्टरीत पोहोचणार आहेत.
मुंबईकरांचा उपनगरीय रेल्वे प्रवास आल्हाददायक आणि वातानुकुलित व्हावा, यासाठी वातानुकुलित उपनगरीय गाडीची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात दोन वर्षांपूर्वीच झाली होती. मात्र प्रत्यक्ष वातानुकुलित गाडी कधी दाखल होणार, याची प्रतीक्षा मुंबईकरांना आजही आहे.
या गाडीची बांधणी चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीमध्ये होत आहे. मात्र या गाडीसाठी लागणारी आवश्यक विद्युत उपकरणे सध्या उपलब्ध नाहीत. ही उपकरणे सप्टेंबपर्यंत चेन्नईला पोहोचणार आहेत. त्यानंतर पुढील दोन ते अडीच महिन्यांत वातानुकुलित गाडी तयार होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा