Air India Pilot मुंबईतल्या एअर इंडियामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला पायलटचा मृतदेह ( Air India Pilot ) तिच्या घरात आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आदित्य पंडीतला पोलिसांनी अटक केली आहे. पवई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सृष्टी तुली असं २५ वर्षीय पायलटचं नाव होतं तिने आत्महत्या केली आहे असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. मरोळ या ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला. आता या प्रकरणात तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे.

सृष्टीच्या कुटुंबाचा आरोप काय?

सृष्टी तुलीचं कुटुंब गोरखपूर या ठिकाणी राहतं. त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे की आदित्य पंडीतने म्हणजेच सृष्टीच्या ( Air India Pilot ) बॉयफ्रेंडने तिची हत्या केली आणि ती आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर सृष्टीच्या कुटुंबाने हा आरोपही केला आहे की आदित्यने सृष्टीला ( Air India Pilot ) ती नॉनव्हेज खाते म्हणून शिवीगाळ केली होती. तसंच मुंबई पोलिसांनी या प्रकरणात बारकाईने लक्ष घालावं अशी विनंती आता मृत सृष्टीच्या पालकांनी केली आहे.

Priyanka Gandhi enters in Parliament
प्रियांका गांधी खासदार म्हणून संसदेत येत असताना राहुल गांधींनी अडवलं; मग केलं असं काही, Video होतोय व्हायरल
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Navneet Rana on Sanjay Raut
Navneet Rana : संजय राऊतांचं नाव ऐकताच नवनीत राणांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले; म्हणाल्या, “अशा लोकांचे…”
Narendra modi threat to kill
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट, मुंबई पोलिसांना आला दूरध्वनी
Ajit Pawar on Maharashtra CM Oath Taking Ceremony Date’Time in Marathi
Maharashtra CM Oath Ceremony Date : महाराष्ट्राचा कारभारी कधी ठरणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली; म्हणाले, “शपथविधी..”
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री असेल तर…”, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटं काय चर्चा झाली?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

बॉयफ्रेंडवर मानसिक छळ केल्याचा आरोप

अंधेरीतल्या मरोळ भागात असलेल्या भाडेतत्त्वावरच्या घरात सृष्टी तुली राहात होती. तिचा मृतदेह याच घरात आढळून आला. आदित्य पंडीत सृष्टीचा मानसिक छळ करत होता त्यामुळे तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आदित्य पंडीतने वैमानिक होण्यासाठीची परीक्षा दिली होती पण त्यात तो नापास झाला. त्यामुळे तो त्याचा राग सृष्टीवर काढत होता अशी माहिती सृष्टीच्या कुटुंबाने पोलिसांना दिली आहे. आता आदित्य पंडीत या प्रकरणात काय कबुली देतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सृष्टी तिचं काम संपवून रविवारी (२४ नोव्हेंबर) घरी आली. त्यावेळी तिचा आदित्य पंडीतशी वाद झाला. आदित्य तिच्या घरी कायमच ये-जा करायचा. दुपारी १ च्या सुमारास आदित्य पंडीत दिल्लीला जाण्यासाठी तिच्या घरातून निघाला. त्यावेळी सृष्टीने त्याला फोन केला आणि सांगितलं की ती तिचं आयुष्य संपवणार आहे. त्यानंतर आदित्य पंडीत तिच्या घरी आला तेव्हा सृष्टीने दार उघडलं नाही. त्याने चावी वाल्या माणसाला त्या ठिकाणी बोलवलं आणि चावी तयार करुन घेतली. फ्लॅटचा दरवाजा उघडून आत गेला तेव्हा त्याने सृष्टीला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहिलं. ज्यानंतर तो तिला सेव्हन हिल्स रुग्णालय या ठिकाणी घेऊन गेला. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेची माहिती तिच्या घरातल्यांना कळवण्यात आली.

FIR मध्ये काय माहिती आहे?

FIR मधल्या माहितीनुसार आदित्य आणि सृष्टी ( Air India Pilot ) यांची भेट दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी सृष्टी तुली द्वारका या ठिकाणी प्रशिक्षण घेत होती. तिला मुंबईतल्या एअर इंडिया कंपनीत वैमानिक म्हणून नोकरी लागल्याने ती २०२३ ला मुंबईत आली. सृष्टी तुली मुळची गोरखपूरची आहे. गोरखपूरमधली ती महिली पायलेट होती. सृष्टी तुली ही गोरखपूरमधली पहिली महिला वैमानिक होती. त्यामुळे तिचं कुटुंब आनंदात होतं. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही तिला सन्मानित केले होते. तिच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.सृष्टी तुलीच्या कुटुंबाचा लष्करी वारसा होता; त्यांचे आजोबा नरेंद्रकुमार तुली १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झाले होते.