मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावू लागला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे.

नेव्ही नगर, कुलाबा येथे सोमवारी सायंकाळी वाईट हवेची नोंद झाली. तिथे हवा गुणवत्ता निर्देशांक २३७ नोंदवला गेला. याबरोबर देवनार, कांदिवली परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २४६, २४६ इतका होता. असे वातावरण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याशिवाय भायखळा, वरळी, वांद्रे – कुर्ला संकुल, शिवडी आणि मालाड परिसरातील हवा ‘मध्यम’ असल्याची नोंद सोमवारी करण्यात आली.

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
North Maharashtra gets colder Know why cold and how long
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जाणून घ्या, थंडी का आणि किती दिवस?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

हेही वाचा >>>मुंबईत थंडीची चाहुल

मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने धोकादयक पातळी गाठली आहे. त्यामुळे सध्या शहरातील हवा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नेव्ही नेगर कुलाबा येथे सोमवारी सायंकाळी हवा निर्देशांक २३७ होता. तसेच देवनारमध्ये २४६, कांदिवलीत २४६, भायखळ्यात १९५, वरळीत १३३, वांद्रे-कुर्ला संकुलात १६८, शिवडीत १२६, मालाडमध्ये १९२ इतका हवा निर्देशांक नोंदला गेला.

दरम्यान, नेव्ही नगर कुलाबा, तसेच देवनार येथे पीएम २.५ कणांची मात्रा अधिक आहे. पीएम २.५ हे अधिक घातक असून ते श्वसनाद्वारे शरारीत जातात, त्याचे हवेतील सामान्य प्रमाण हे ३५ मायक्रो घनाहून जास्त नसावे. हे कण पीएम १० च्या तुलनेत सूक्ष्म असल्याने सहज शरारीत प्रवेश करतात. त्यामुळे ते आरोग्यास घातक ठरतात. धुलीकणांत कार्बन सल्फेट, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांचे प्रामाण अवाक्याबाहेर वाढल्यास ते धोकादायक ठरते. यामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढतात. श्वसन विकारात दमा, न्युमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे तसेच त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढले आहे.