लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : मुंबईतील हवेचा दर्जा गेल्या एका महिन्यापासून खालावला असून मुंबईतील काही भागांत हवा ही सातत्याने ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीतच नोंदली जात आहे. यामध्ये बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश असून गेल्या महिन्याभरात दहा ते पंधरा दिवस ‘अतिवाईट’ तर उर्वरीत दिवस येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली.

बोरिवलीमध्ये मागील एका महिन्यातील साधारण १० ते १५ दिवस ‘वाईट’ हवेची नोंद झाली तर, काही दिवस सलग ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. येथील हवा निर्देशांक हा नोव्हेंबर महिन्यापासून २०० ते ३०० पर्यंत नोंदवला जात आहे. वारे वाहते नसल्याने प्रदूषके साचून राहत असल्याचा परिणाम मुंबईत अनेक ठिकाणी दिसून येत असला तरी, बांधकामे, वाहतूक कोंडी या समस्या देखील हवा प्रदूषणाला तितक्याच जबाबदार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील वर्षी देखील बोरिवली, मालाड, विलेपार्ले परिसरातील हवा सातत्याने अतिवाईट ते वाईट श्रेणीत नोंदली जात होती. यामध्ये बोरिवली परिसरातील हवा निर्देशांक अनेकदा २५० – ३२० दरम्यान होती. त्याखालोखाल विलेपार्ले येथे देखील २०० – ३५०, मालाड २०० – २५०आणि शिवाजीनगर गोवंडी येथे २५० – ३०० नोंदला गेला होता.

आणखी वाचा-एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

समीर अॅपच्या नोंदीनुसार गुरुवारी बोरिवली येथील हवेचा दर्जा ‘वाईट’ नोंदवला गेला तर बुधवारी बोरिवली येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून हवा प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील हवा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपासून खालावू लागली. विविध उपाययोजना करून देखील काही परिसरातील हवेच्या गुणवत्तेत फरक पडलेला नाही. त्यामुळे काही ठराविक परिसरात स्थानिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्याचा जास्त परिणाम वयोवृद्ध आणि लहान मुलांवर होत आहे. समीर अॅपच्या नोंदीनुसार गुरुवारी मुंबईचा हवा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला असला तरी अनेक भागात हवा वाईट असल्याची नोंद झाली आहे. त्यात प्रामुख्याने बोरिवली, मालाड, देवनार, कांदिवली, माझगाव या भागांचा समावेश आहे.

मुंबईत गुरुवारी बोरिवली आणि मालाड येथे सायंकाळपर्यंत ‘वाईट’ हवा होती. दोन्ही केद्रांवर पीएम २.५ धुलिकणांचे प्रमाण अधिक होते. त्या भागांमध्ये सुरु असलेल्या बांधकामांचा आणि खराब रस्ते, वाहतूक यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हवेचा दर्जा खालावत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी रस्तेही उखडलेले आहेत त्यामुळे गर्दीच्यावेळी प्रदूषण आणखी वाढते. सायंकाळी या भागात धूळ उडण्याचे प्रमाण अधिक असते. समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी सायंकाळी मुंबईच्या एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक १६८ इतका होता. बोरिवली (२८०), देवनार (२२१), कांदिवली (२२१), मालाड (२७०) माझगाव (२१६), नेव्ही नगर कुलाबा (२४५), वरळी (२०१) येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली.

आणखी वाचा-विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

हवेचा दर्जा का घसरला ?

मुंबईच्या तापमानात मागील दोन- तीन दिवसांपासून घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात धुके होते. त्यातच वाऱ्यांचा वेग मंदावल्याने हवेत प्रदूषके साचून राहिली. काही भागात गुरुवारी धुरके होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २८.५ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

मागील एक महिन्यात सर्वाधिक प्रदूषित असलेले परिसर

बोरिवली- ३०० ते ३२० अतिवाईट- १०,११,१२,१४, १७, १८ नोव्हेंबर
शिवडी- ३०० ते ३१५ अतिवाईट- ३१ ऑक्टोबर, १,२,३,४, १०,११, १२,२०,२१ नोव्हेंबर
मालाड- २५० ते ३१५ अतिवाईट- १०,११,१२, १५, १६, १७, १८ नोव्हेंबर
शिवाजीनगर गोवंडी- ३०० ते ३१५ अतिवाईट- ४,५,६,१२, १३, १४ नोव्हेंबर
देवनार- २०० ते २५० अतिवाईट- १०, १४, १८,२० नोव्हेंबर
नेव्ही नगर कुलाबा- २५० ते ३०० अतिवाईट- ९, ११, १२ डिसेंबर