लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील एक महिन्यापासून मुंबईची हवा गुणवत्ता खालावली आहे. अनेक भागात सातत्याने वाईट हवेची नोंद झाली. दरम्यान, मंगळवारी समीर ॲपच्या नोंदीनुसार मुंबईच्या काही भागातील हवा ‘समाधानकारक’ तर काही ठिकाणची हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली आहे. यामध्ये शिवडीचा समावेश असून शिवडी येथे मंगळवारी ‘चांगली’ हवा नोंदली गेली आहे.

Sunil Pal goes Missing
Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता, पत्नीची सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र
Marathi Marwadi conflict in Mumbai
Marwadi vs Marathi Conflict : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!
Former director granted bail in Ghatkopar billboard accident case
घाटकोपर फलक दुर्घटनाप्रकरणी माजी संचालिकेला जामीन
Municipal Commissioner Bhushan Gagrani scold engineers it is impossible to solve problems sitting in office
कार्यालयात बसून समस्यांचे निराकरण अशक्य, पालिका आयुक्तांनी केली अभियंत्यांची कान उघडणी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपनुसार, मंगळवारी शिवडी येथील हवा ‘चांगली’ नोंदली गेली. शिवडी येथील हवा निर्देशांक ४९ इतका होता. तसेच शीव, भांडूप आणि बोरिवली येथे ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे ९६, ९५, ९२ इतका होता. या भागातील हवा ‘समाधानकारक’ असली तरी तेथील हवा गुणवत्तेत मात्र फरक पडलेला नाही. तेथील हवा गुणवत्ता ‘जैसे थे’च आहे. गोवंडी – शिवाजीनगर, वरळी, माझगाव, मालाड, देवनार येथे ‘मध्यम’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे १४९, १२९, १५५, १७७, १४८ इतका होता. दरम्यान, अनेक भागात सोमवारी ‘वाईट’ हवेची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी काही भागातील हवा गुणवत्तेत सुधारणा झाली.

आणखी वाचा-कार्यालयात बसून समस्यांचे निराकरण अशक्य, पालिका आयुक्तांनी केली अभियंत्यांची कान उघडणी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान ‘चांगले’, ५१-१०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१-२०० दरम्यान ‘मध्यम’, २०१-३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१-४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे ‘अतिधोकादायक’ समजली जाते.