मुंबई : मुंबईतील हवेच्या दर्जाची गुरुवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंद झाली. समीर ॲपनुसार गुरुवारी सायंकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११६ इतका होता. मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदला गेला असला घाटकोपरमध्ये ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तर काही भागातच ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली. घाटकोपरमध्ये गुरुवारी सायंकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक २८२ इतका होता.

हेही वाचा >>> दोन कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; रक्कमेतून आरोपीने बंगला बांधला, तसेच दुबईतून दागिने खरेदी केल्याचा आरोप

Dadar Ratnagiri passenger closed and during that time Dadar Gorakhpur train
दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून गोरखपूरला नवी गाडी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
Amitabh bachchan post about ratan tata death
एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
passenger was robbed by thieves on the skywalk of Kalyan railway station
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही भागात बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने हवेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा;सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त

दरम्यान, समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी काही भागात ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली आहे. यामध्ये बोरिवली (९७), कुलाबा (७९), खेरवाडी वांद्रे (९९), भांडूप (९८) आणि मालाड (९२) हवा गुणवत्ता निर्देशांक होता. तर वांद्रे – कुर्ला संकुल (१३५), भायखळा (१३४), माझगाव (१३१), पवई (११६), वरळी (११५), शीव (१४५) आणि विलेपार्ले येथे (१२५) हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदला गेला. या भागांत ‘मध्यम’ हवेची नोंद झाली.मुंबई शहरात नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून धुलीकणांच्या प्रमाणाने धोकादायक पातळी गाठली आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनासंबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे.

Story img Loader