मुंबई : विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा इच्छित स्थळी जाण्यासाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना आता या बसचे आगाऊ तिकीट काढून आसन आरक्षित करता येणार आहे. त्यासाठी बेस्टच्या चलो अपद्वारे आगाऊ तिकीट काढता येईल, अशी माहीती बेस्ट उपक्रमाने दिली.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

new Thane railway station is being built between Thane and Mulund stations near psychiatric hospital
नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Bus services stopped in Kurla West after BEST bus accident mumabi news
कुर्ला स्थानकातील बेस्ट सेवा बुधवारीही बंद; प्रवाशांचे हाल
2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
best initiative self owned buses gradually decreased leased buses increasing
भाडेतत्वावरील बसमुळे ‘बेस्ट’ धोक्यात; बसच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
Best bus accident Kurla, BJP demands inquiry Best bus,
बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

ही सेवा शुक्रवार, ९ सप्टेंबरपासून विमानतळसह अन्य प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. तीन वातानुकूलित विजेवरील बस सध्या सेवेत आहेत. या बसचे चलो अपचा माध्यमातून आरक्षण करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना चलो अँप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर दक्षिण मुंबई बॅक बे करिता बसमार्ग क्रमांक ८८१, वाशी खारघर करिता बस मार्ग क्रमांक ८८२ आणि ठाण्याकरिता बस मार्ग क्रमांक ८८४ सर्च बारवर शोधावे. बसमार्गाची निवड केल्यावर ‘रिझर्व्ह सीट’ हा पर्याय निवडावा लागेल.  नंतर बसमध्ये चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण निवडावे. त्यानंतर आपली वेळ निवडून तिकिटाची रक्कम जमा करावी. आपली बस नेमकी कुठे आहे याची माहिती घेऊन आरक्षित केलेल्या आसनाद्वारे आरामात प्रवास करता येणार आहे.

बसचे मार्ग कोणते ?

१)  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (टी 2) दक्षिण मुंबई, बॅक बे आगार

२) छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळा पासून (टी 2) जलवायू विहार /खारघरमार्गे पामबीच रोड

३) छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळापासून (टी 2) कॅडबरी जंक्शन ठाणे चलो अँपद्वारे सात दिवस किंवा काही तास आधीही तिकीट आरक्षित करता येणार आहे.

Story img Loader