वृत्तसंस्था, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईजवळच्या वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. तसे झाल्यास समुद्रामध्ये बांधलेले भारताचे हे पहिले विमानतळ असेल. काहीच दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीचे संकेत दिले होते. तर, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे विमानतळ बांधणार असल्याचा उल्लेख केला होता.

देशातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचा भाग म्हणून वाढवण बंदराजवळच हे विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव आहे असे या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. प्रस्तावित वाढवण विमानतळ मुंबईच्या सध्याच्या विमानतळापासून १२५ किलोमीटर अंतरावर आहे.

‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम किनारपट्टीजवळ बांधल्या जाणाऱ्या या विमानतळाची रचना हाँगकाँगचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ओसाकाचे कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्याशी मिळतीजुळती असेल. ही दोन्ही विमानतळे कृत्रिम बेटांवर बांधण्यात आली आहेत.

वाढवण विमानतळाला केंद्र सरकार, तसेच महाराष्ट्र सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. यासंबंधी गेल्या महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. विमानतळ बांधण्यासाठी आता त्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी अभ्यास सुरू केला जाईल. या प्रक्रियेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाची मदत घेतली जाईल. एकदा संबंधित अभ्यास पूर्ण झाले की यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीचा अंदाजे खर्च जाहीर केला जाईल.

तज्ज्ञ साशंक

वाढवण विमानतळाचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असला तरी त्याच्या व्यवहार्यतेबद्दल तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. विशेषत: प्रवासी वाहतुकीबद्दल.

गुंतवणुकीचा पैसा वसूल करण्यासाठी हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणे आवश्यक असेल.

अनेक लहान शहरांमध्ये नवीन विमानतळे बांधण्यात आली आहेत. मात्र, त्यांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ते अडचणीत आहेत.