मुंबई : बँकॉक येथून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी दोन प्रवाशांना हवाई गुप्तचर कक्षाने (एआययू) मुंबई विमानतळावरून शुक्रवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्या प्रवाशांकडून सुमारे ४१४७ ग्रॅम उच्च प्रतिचा गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे सव्वाचार कोटी रुपये आहे. आरोपी प्रवाशाने यापूर्वीही अशा प्रकारचे गांजाची तस्करी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी एआययू अधिक तपास करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद हसरुद्दीन नालुकुडी परम्ब (२६) व अहमद रियास के. पी. (२९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते दोघेही केरळमधील रहिवासी आहेत. संशयीत प्रवासी बँकॉकहून अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती एआययूच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एआययूच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी प्रवाशाला एआययूने थांबवून त्याची व त्याच्याकडी बॅगेची तपासणी केली असता त्यात १० संशयास्पद पाकिटे सापडली.

हेही वाचा…कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जावर १० जानेवारी रोजी निर्णय

त्यांची तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ असल्याचे आढळले. एआययूच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ चाचणी कीटद्वारे तपासणी केली असता तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एआययूने १० पाकिटांमधील गांजा तपासला व त्याचे वजन केले असता ते ४१४७ ग्रॅम असल्याचे समजले. त्याची किंमत चार कोटी १४ लाख रुपये आहे. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एआययूने दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी यापूर्वीही गांजाची तस्करी केल्याचा संशय आहे. त्याच्या संपर्कांत असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiu arrested two passengers from mumbai airport on friday for smuggling ganja from bangkok mumbai print news sud 02