माहिती व जनसंपर्क विभागाने मुख्यमंत्र्यांची मान्यता न घेता ‘मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले’ असा शेरा नस्तीवर लिहून सुमारे ५०० कोटी रुपयांच्या जाहिराती फडणवीस सरकारच्या काळात वेगवेगळ्या विभागांनी दिल्या आहेत, असा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. ही गंभीर अनियमितता आणि गैरव्यवहार असे म्हणत या प्रकरणात दोषी आरोपींना पाठीशी न घालता तातडीने निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – Maharashtra Budget 2023-2024 : पीकविम्याबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार केवळ ‘एवढे’ रुपये

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

राज्याच्या प्रशासकीय विभागांना शासकीय योजनांची जाहिरात करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जाहिरातीच्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी असणे अनिवार्य आहे. मात्र फडणवीस सरकारच्या काळात पण २०१९-२० च्या माध्यम आराखड्याला एकाही विभागाने मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेतली नाही. मुख्यमंत्र्यांची मान्यता न घेता विभागांनी ५०० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या जाहिराती दिल्या, असा आरोप अजित पवार यांनी केला.

२०१९ मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. त्यादरम्यान विविध शासकीय विभागांनी तत्कालीन फडणवीस सरकारने ५ वर्षात घेतलेले निर्णय आणि केलेली कामाबाबत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली. मात्र, या जाहिराती देताना मुख्यमंत्र्यांची कोणीही परवानगी घेण्यात आली नव्हती. हा घोटाळा निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक न्याय विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव व सहसचिव, माहिती व जनसंपर्कचे तत्कालीन महासंचालक व माजी संचालक यांच्यासह आठ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशी अहवालानुसार, ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’, असा शेरा मारुन माहिती व जनसंपर्क विभागातील सुमारे ५०० कोटींहून अधिकच्या जाहिराती दिल्या, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा; जाणून घ्या

दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या २०१९-२० च्या माध्यम आराखड्याच्या प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची तातडीने कार्योत्तर मान्यता प्राप्त करुन घ्यावी, असे आदेश दिले आहेत. हा एकप्रकारे या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न आहे, असा आरोपही अजित पवारांनी केला. तसेच दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.