मुंबईत विधानसभवनाच्या पायऱ्यांवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. “ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, ५० खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले”, अशा अनेक घोषणा देत विरोधकांनी सरकारला घेरलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा महाविकासआघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे ईडी सरकार असल्याची खोचक टीकाही करण्यात आली.

दरम्यान, विधासनभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेसाठी मांडण्यात आलं होतं. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान फटकेबाजी करत शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र त्यानंतर भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा : आले मना, केली घोषणा हे योग्य नाही!; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

विशेष म्हणजे जीएसटीच्या दरांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील समितीबद्दल बोलताना फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी देवेंद्र फडणवीस यांनी अगदीच वेगळी उपमा दिली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्तेत असलेल्या सरकारचा केलेला उल्लेख ऐकून सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य हसू लागले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar ambadas danve mva leaders protest against shinde fadnavis government pbs