शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. आम्हाला अपेक्षा आहे, अजित पवारांनी सरकारमध्ये यावं. ते सरकारमध्ये आले, तर आनंद होईल, असं केसरकरांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले केसरकर?

राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यावर बोलताना केसरकरांनी सांगितलं की, “अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. अजित पवार विरोधी पक्षाचे नेते आहेत, किमान त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. संजय राऊत रोज बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण, अजित पवार बोलतात तेव्हा जनता ते गांभीर्याने घेते. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यासाठी अजित पवार आमच्याबरोबर आघाडीवर असतील.”

हेही वाचा : “अरे, बेअक्कल…”, सावरकरांचा धडा वगळल्याप्रकरणी आशिष शेलारांची काँग्रेसवर टीका, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

“राष्ट्रवादीत अजित पवारांबरोबर काय होतं, हे…”

“अजित पवार यांनी सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. अजित पवार कार्यक्षम नेते असून, त्यांच्या कामाचा फायदा राज्याला झाला पाहिजे. राष्ट्रवादीत त्यांच्याबरोबर काय होतंय, हे सर्वांना माहिती आहे,” असं केसरकरांनी म्हटलं. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा : “अजित पवारांनी ‘ती’ यादी लवकरच जाहीर करावी”, संजय राऊतांचं विधान; म्हणाले, “आमच्याकडेही…!”

“…त्यात चुकीचं काय आहे”

“अमिताभ बच्चन सर्वच सिनेमात हवे असतात. त्यांच्या आवाज, फोटो, लूक आणि सही सुद्धा चालते. तसेच, अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे चुकीचं काय आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar amit bacchan in maharashtra politics say supriya sule over kesarkar offer ssa
Show comments