राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार १०-१५ आमदार घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नाही, तर अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्तही प्रकाशित झाले. यानंतर आता अखेर अजित पवारांनी या आमदारांच्या बैठकीच्या वृत्तावर भूमिका स्पष्ट केली. तसेच सोमवारच्या दिवसभरातील नियोजित कार्यक्रमावरही भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले, “खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे.”

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना ऑफर दिली होती का? अजित पवार स्पष्टच बोलले, “आम्ही…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?

हेही वाचा : VIDEO: अजित पवार १५-२० आमदार घेऊन भाजपाबरोबर जाणार का? रवी राणा स्पष्टच म्हणाले, “अमित शाहांच्या…”

“मंगळवारी (१८ एप्रिल) मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे. तेथे कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी,” असा खुलासा अजित पवार यांनी केला.

“अजित पवारांनी कोणताही निर्णय घ्यावा, मी त्यांच्या पाठीशी उभा असेन”

विरोधी पक्ष नेते अजित पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत मी असेन, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. अण्णा बनसोडे आज मुंबईत जाऊन अजित पवारांची भेटही घेणार आहेत. हे तेच अण्णा बनसोडे आहेत, जे पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांसोबत होते.

हेही वाचा : अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आमच्या…”

शेवटच्या क्षणापर्यंत अण्णा यांनी अजित पवारांना त्या वेळीही पाठिंबा दिला होता, आताही अजित पवार भूकंप करतील, अशी चर्चा सुरू असताना, तेच अण्णा त्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार झालेत. दादा जो निर्णय घेतील त्याला माझी सहमती असेल अन् शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत असेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Story img Loader