शासकीय कर्मचाऱ्यांच्या संप आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के शासकीय कर्मचाऱ्यांकडे हरामचा पैसे आहे, असं विधान केलं होतं. दरम्यान, यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत चांगलंच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्याच्या पंचनाम्याच्या मुद्द्यावरूनही सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “रामदास कदम हे झंडू बाम लावून रडतात, असा रडका वाघ…”, सुषमा अंधारेंची खोचक टीका!

काय म्हणाले अजित पवार?

“कर्मचाऱ्याच्या संपामुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. आता कर्मचाऱ्यांचा संप आणि शेतपिकांचे पंचनामे हे दोन्ही विषय एकमेकांशी निगडीत झाले आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्र हा दुहेरी कात्रीत सापडला आहे. अशावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सामंस्याची भूमिका घ्यायला हवी. मात्र, सत्ताधारी पक्षातील एक आमदारने सरकारी कर्मचारी हरामाचे पैसे कमावतात, असं म्हटलं. हे पटतं का?” अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा – श्रीकांत शिंदेंचं ‘ते’ कार्यालय कुणाच्या जागेवर? सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाल्या, “देवेंद्रभाऊ…!”

पुढे बोलताना, “हाताची पाचही बोटं सारखी नसतात, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, सर्वच कर्मचाऱ्यांना तुम्ही एकसारखं समजणार असाल, तर राज्य चालवणं कठीण होईल, असेही ते म्हणाले. तसेच ज्या भागात गारपिटीने पिकांचं नुकसान झालं आहे, त्या भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होईल, पंचनामे करावे”, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – Maharashtra News Live : शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा, विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

दरम्यान, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही सरकारला लक्ष्य केलं. “सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”, अशा शब्दात त्यांनी सरकारला खडसावलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticized sanjay gaikwad after statement on government employee spb