Maharashtra Assembly Monsoon Session : आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली आहे.’पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “आम्हाला आई-बहिणींवरून…” विधानभवनासमोर आमदारांमध्ये राडा झाल्यानंतर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

काय म्हणाले अजित पवार?

“आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला. महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, ‘चारोच्या मनात चांदणं’ असा हा प्रकार आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा – विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले, शिवीगाळ केल्याचा मिटकरींचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

“अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही महाविकास आघाडीचे आमदार रोज साडेदहा वाजता विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत असतो, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर मागण्या असलतील. त्या विविध घोषणांद्वारे सरकारसमोर मांडत असतो. मात्र, त्यातील ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातून हा प्रकार घडला”, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticized shinde camp mla on altercation between amol mitkari and mahesh shinde in mh assembly monsoon session spb
Show comments