मुंबई : एकनाथ शिंदे हे घोटाळे करूनच मुख्यमंत्री झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पंतप्रधान असा उल्लेख, स्पर्धा परीक्षार्थीचे लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगाकडे पत्र दिले आणि साडेतीनशे पन्नास कोटी असे उद्योगपतींसमोर काढलेले उद्गगार यावरून मुख्यमंत्री आणि घोटाळे हे जणू काही समीकरणच तयार झाले असून, घोटाळय़ांचा पिच्छा काही सुटत नाही, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर चढविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐक्याची वज्रमूठ आवळून या सरकारला खाली खेचले पाहिजे, असा कानमंत्रही तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिला. वज्रमूठ सभेतील अजित पवार यांच्या उपस्थितीविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. पवारांनी उपस्थित राहून केलेल्या भाषणात शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे-फडणवीस सरकार हे लोकांच्या मनातील सरकार नाही. गद्दारी आणि दगाफटका करून हे  सरकार सत्तेवर आले आहे. घोटाळे करून सत्तेत  आलेल्या या सरकारला जागा दाखवायची हीच वेळ आहे, असेही  आवाहन पवार यांनी केले.

मुंबईत मराठी माणूस हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे टिकला आहे. हे बाळासाहेबांचे मोठे योगदान आहे.मात्र काहीनी गद्दारी करून चांगले चाललेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले. त्यासाठी १५० बैठका घेतल्याचा दावा मंत्री तानाजी सावंत यांनीच  केला आहे. हे गद्दारी करून आलेले सरकार आहे, अशी टीका पवार यांनी केली.

हे सरकार जाहिराती करणारे सरकार आहे. करोडो रूपये जाहिरातीवर खर्च केले जात आहेत. मात्र या सरकारला बेरोजगारी,महागाई,शेतकरी याकडे पाहण्यास वेळ नाही.

महाविकास आघाडी  म्हणून आपण जर एकदिलाने लढलो तर त्याचा परिणाम आपल्याला मधल्या काळातील काही निवडणुकांच्या निकालांवरून पहावयास मिळाले. .त्यामुळे आपली एकजूट कायम ठेवू या,असे आवाहन पवार यांनी  केले.

निवडणुकीतही एकजूट – अशोक चव्हाण

महाविकास आघाडी एकत्र राहणार असून ती पुढील सर्व निवडणुकीत एकत्रच लढेल, असा विश्वास   माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी  व्यक्त केला.  महाविकास आघाडीने कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला जागा दाखवली  याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. . आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी प्रसंगी एक पाऊल मागे घेत भाजपचा पराभव करण्यासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, असे  आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी  केले. 

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही – आदित्य ठाकरे 

केंद्रात आतापर्यंत वेगवेगळय़ा विचारांची सरकारे आली. पण त्यांनी कधी मुंबईला मोडण्याचे काम केले नव्हते. पण केंद्रातील सध्याच्या सरकारचे मुंबईला मोडण्याचे आणि दिल्लीपुढे झुकविण्याचे मनसुबे आहेत. पण हे प्रयत्न कदापि यशस्वी होणर नाहीत. असे प्रयत्न करणाऱ्यांना मोडेल पण महाराष्ट्र कधी झुकणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला. मुंबई महापालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवीवर भाजपचा डोळा आहे. .त्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू आहे. राज्यातील घटनाबाह्य सरकारचा हा थोडय़ा दिवसांचा खेळ आहे. हे सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार, असे भाकित आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.