मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल सलग दुसऱ्या दिवशी विविध प्रकारची चर्चा सुरू होत्या. त्यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम अचानक रद्द केल्याचे बोलले जात होते. पण आपल्याबद्दल होत असलेल्या चर्चा वावडय़ाच असल्याचे स्पष्टीकरण स्वत: अजित पवार यांनी दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाविकास आघाडीच्या नागपूर येथील ‘वज्रमूठ’ सभेस उपस्थित राहून रविवारी रात्री उशिरा पवार मुंबईत पोहोचले. त्यानंतर खारघर येथील रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळय़ात उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आणि उपचार घेत असलेल्या अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना धीर देण्यासाठी कळंबोली येथील ’एमजीएम’ रुग्णालयात ते सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, त्यामुळे आपण मुंबईतच होतो, असा खुलासा अजित पवार यांनी केला. मंगळवारी विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहून नियमित कामकाज करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूरमधील सभेत अजित पवार यांनी भाषण केले नव्हते. त्यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले असताना नागपूरमध्ये भाषण करून भाजपवर टीका केली असती तरी संशयाचे वातावरण दूर झाले असते, असे काँग्रेसच्या गोटातून बोलले जात आहे. सातत्याने संशयाचे वातावरण तयार होत असल्याने राष्ट्रवादीतही चर्चा सुरू झाली आहे.

मी आमदारांची अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली हे असत्य आहे. यासंदर्भातील बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यात तथ्य नाही.

– अजित पवार, विरोधी पक्षनेते