अगदी बहुमतात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून स्वतःसह ९ राष्ट्रवादीच्या आमदारांचा शपथविधी पार पाडला. या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट आणि अजित पवारांचा गट यांच्यात जोरदार दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच अजित पवारांनी मंगळवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीला हजेरी लावली. मंत्रालयात आल्यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं.

मंत्रालयात गेल्यावर अजित पवारांनी ट्वीट करत म्हटलं, “आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.”

ganja Mumbai, Two arrested for selling ganja,
मुंबई : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
Women Worli agitation toilets, Mumbai,
मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी…
Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
Mumbai 10 lakh looted marathi news
मुंबई : शस्त्रांचा धाक दाखवून १० लाख रुपये लूटले
All three parties in the Grand Alliance are contesting for the post of Guardian Minister Mumbai news
पालकमंत्रीपदासाठी ओढाताण; जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीतील तिन्ही पक्षांची दावेदारी
no alt text set
राणीच्या बागेतील हत्तींचा अधिवास पोरका
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
In the grand alliance government BJP gave important portfolios to those from other parties Mumbai news
भाजपमध्ये प्रस्थापितांना धक्का; अन्य पक्षांमधून आलेल्यांना महत्त्वाची खाती, वरिष्ठ नेत्यांना सूचक इशारा
Uddhav Raj Thackeray meet at family function Mumbai news
उद्धव- राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; कौटुंबिक कार्यक्रमात भेट

मंत्रीमंडळ बैठकीच्यावेळी राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

हेही वाचा : Maharashtra Political News Live : तुम्ही नाराज आहात का? मंत्रीमंडळ बैठकीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…, वाचा प्रत्येक अपडेट…

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : VIDEO: बंडखोरीनंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून ‘हे’ ८ महत्त्वाचे निर्णय

दरम्यान, या बंडानंतर पहिल्यांदाच मंगळवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने ८ महत्त्वाचे निर्णय घेतले.

Story img Loader