मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सुरू झालेल्या चलबिचलीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने गुरुवारी आमदारांची बैठक बोलाविली आहे. पक्षाचे काही आमदार शरद पवार गटात परण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला किती आमदार हजेरी लावतात याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने केवळ चार जागा लढवल्या होत्या. पक्षाला रायगड ही एक जागा जिंकता आली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. महायुतीच्या घटक पक्षाची मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्राप्त झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व बाबींची चर्चा आमदारांच्या बैठकीत करण्यात येणार आहे. लोकसभेचे मतदार संपल्यानंतर राष्ट्रवादी आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती.

Deputy Chief Minister Statements by Devendra Fadnavis discussion BJP
फडणवीस यांचा निर्णय नाराजीपोटी ?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
what pankaja munde said?
पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?, “कुणीही रडीचा डाव खेळू नये, पक्ष फुटले तरीही त्यांच्या जागा…”
DCM Ajit Pawar
सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर ४८ तासांच्या आत अजित पवारांचा मोठा निर्णय, युगेंद्र पवारांना पहिला झटका
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार होते. त्यापैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली. अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर आहेत, असे विधान शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.